कोकण रेल्वेच्या ३१ वर्षांच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर आयोजित स्थापना दिवस समारंभात साहित्यिक सुनील कांबळे (हेतकर) यांना स्थापना दिवस पुरस्कार जाहीर
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :संजय शेळके
🎴वैभववाडी दि१७ऑक्टोबर :- कोंकण रेल्वे द्वारा प्रतिवर्षी १५ आॅक्टोबर दिनी आयोजित स्थापना दिवसाच्या समारंभात, विविध विभागातील महत्त्वपूर्ण कामगिरी करणार्या कामगारांना ‘स्थापना दिवस’ या पुरस्काराने सन्मानित करते. हा पुरस्कार अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांच्या स्तरावर दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार एकूण पंधरा कर्मचार्यांना दिला गेला आहे यामध्ये सुनील हेतकर यांनाही, त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरुप ₹ १०, ०००, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे आहे.
सुनील कांबळे हे वाङमयीन क्षेत्रात सुनील हेतकर या नावाने परिचित अाहेत. त्यांचा ‘टेळका’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध असून ‘थेरीगाथा: स्त्रीमुक्ती, समाज आणि तत्त्वज्ञान’ हा महत्त्वपूर्ण संशोधनपर वैचारिक ग्रंथही प्रसिद्ध आहे. याशिवायही त्यांचे साहित्य प्रकाशित आहे. कवी, लेखक, संपादक, प्रकाशक असलेल्या सुनील हेतकर यांना आजवर संशोधन कार्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल वसंत मून व इतर अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सम्यक साहित्य संसद या वाङमयीन संस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष असून वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ, मुंबई शाखेचे कार्याध्यक्ष आहेत. सामाजिक, वाङमयीन कार्यासोबत कोकण रेल्वेच्या सेवेतही ते आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*
*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*
_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_
*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

