आणखीकोकणरत्नागिरीराजकीय

वाशिष्ठी नदीवरील नवीन पूल वाहतुकीस खुला

🛑 लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या पाठपुराव्याला यश – प्रशांत यादव

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण : दि. ०४ मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातंर्गत बहादुरशेखनाका येथील वाशिष्ठी नदीवरील रखडलेला नवीन पूल अखेर शनिवारी वाहतुकीस खुला झाला आहे. लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या पाठपुराव्यामुळे या पुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे, अशी प्रतिक्रिया चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्यांमधून केली होती. याची दखल घेऊन केंद्र शासनाने या महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला हिरवा कंदील दिला आणि गेल्या काही वर्षांपासून कामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदी वरील नवीन पुलाच्या कामाला देखील सुरुवात झाली होती. परंतु, सातत्याने या पुलाचे काम रखडत होते. दरम्यान या पुलाचे काम रखडल्याने ब्रिटिशकालीन जुन्या पुलावरून वाहतूक सुरू होती मात्र या मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालकांची पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. यामुळे नवीन पुलाचे काम लवकर व्हावे अशी मागणी होत होती.

लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या पाठपुराव्यानंतर या पुलाच्या कामाने वेग घेतला या कामावर सर्वांचे लक्ष होते. दोनच दिवसांपूर्वी या पुलाची तांत्रिक तपासणी करण्यात आली आणि शनिवारी या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तर जुना पुल आपत्कालीन परिस्थितीत वापरला जाईल असे सांगण्यात आले आहे. याबाबत चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बहादूरशेखनाका येथील वाशिष्ठी नदीवरील नवीन पूल वाहतुकीस खुला झाला असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. नवीन पूल वाहतुकीस खुला झाल्याने सर्वांच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या पाठपुराव्यामुळे यश आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

      _अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!