वैभववाडी तालुक्यातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्या; वैभववाडी युवक काँग्रेसच्या वतीने राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी : दि. ०४ तालुक्यातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्या. या मागणीचे निवेदन राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना वैभववाडी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले आहे. मंत्री श्री. चव्हाण यांची पदाधिका-यांनी मुंबई येथे भेट घेतली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार व खासदार नाहीत. त्यामुळे तालुक्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनात कोकिसरे व सोनाळी गावातील विकास कामांचा समावेश आहे.
निवेदन देतेवेळी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव, काँग्रेस पदाधिकारी आनंद पवार, प्रमोद कदम, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत आदी उपस्थित होते.
सविस्तर वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

