आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

संचयनी घोटाळा; १०० दिवसांत संचयनिचा प्रश्न मार्गी लावणार

🛑भाजपचे फायरब्रॅंड नेते माजी खासदार किरिट सोमय्या यांचा पत्रकार परिषदेत इशारा

🛑घोटाळेबहाद्दूरणा शिक्षा, फरार आरोपी घोषित करणार

🛑दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांनीसुद्धा प्रकरण घेतले गांभीर्याने, झाली बैठक…

🛑ठेवीदारांना मिळणार ठेवी परत, मालमत्तेचा करणार लिलाव, खासदार किरीट सोमय्या यांची माहिती

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी – रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली : दि. ०३ संचयनी सेव्हिंग घोटाळा मी संसदेत उपस्थित केला होता. २००५ मध्ये यासंबंधी केस फाईल झाली आहे. १५ वर्षांत याबाबत न्यायालयात फक्त तारीख पे तारीख सुरू आहे. एकदाही सुनावणी झाली नाही. या घोटाळ्यात चार आरोपी आहेत, त्यातील एक आरोपी फरार आहे. तो जाहीर करून त्याच्यावर अटकेची कारवाई करा. संचयणीच्या मालमत्ता हस्तगत करून ठेवीदारांना पैसे परत करा. केंद्र सरकारने संचयनी प्रकरणी राज्य सरकार कडे स्टेटस रिपोर्ट मागितला आहे. या घोटाळ्यातील दोषींवर कारवाई आणि ठरविदारांच्या हितासाठी मोदी सरकार आणि रिझर्व्ह बँकेची मदत घेऊ मात्र पुढील १०० दिवसांत संचयनिचा प्रश्न मार्गी लावणार. असा इशारा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला.

कणकवलीत प्रहार भवन येथे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत,व्यासपीठावर उपस्थितीत होते.

आमदार नितेश राणें यांच्यासोबत पोलीस डिजी ना भेटणार आहोत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही भेट घेणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचीसुद्धा भेट घेतली आहे, त्यांनीही कारवाई करण्यासाठी फेर तपास करण्याचे सांगितले आहे. फरार आरोपी कोण आहे, त्याचे नाव पोलीस आधी कळवतील. त्यानंतर ते सांगू. असे सांगतानाच श्री. सोमय्या यांनी एकीकडे संचयनी घोटाळेबहाद्दूरणा शिक्षा व्हावी. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील संचयणीच्या हजारो गुंतवनुक दारांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता जप्ती करून विकून रिफंड देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या प्रकरणी दिल्लीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय वित्त राज्य मंत्री कऱ्हाड यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. अशा घोटाळ्यातील बँकेच्या वसुलीसाठी जो केंद्राने कायदा केला आहे. त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले.

==========================================================================

🔥खुशखबर !!! खुशखबर !!! खुशखबर !!!🔥

🛑 गणेश चतुर्थीनिमित्त कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलच्या वाचकांसाठी घेऊन येत आहोत एक खास आणि आकर्षक ऑफर…

🔴जाहिरात देणाऱ्यांसाठी आता जाहिरातीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत, हि ऑफर फक्त गणेश चतुर्थी पर्यंतच लागु राहील.🔴

🔥जाहिरात दर🔥

◼️१] ८ दिवस – १०००रू (इतर दिवशी = १५००रू).

◼️२] १५ दिवस – २०००रू (इतर दिवशी = ३०००रू).

◼️३] १ महिना – ५०००रू (इतर दिवशी = ६०००रू).

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलचा श्री. गणेश चतुर्थी आरती संग्रह – २०२१ प्रकाशित होणार आहे.

या आरती संग्रहमध्ये ज्यांना कोणाला जाहिरात द्यायची आहे, त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधा 👇…

✍️कणकवली प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

📲 मोबाईल नंबर -: 9422515714

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचुक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!