चौकुळ चिखलव्हाळ बेरडकी येथील विज तब्बल अडीच महिन्यांपासून गायब……………….चार दिवसात वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास वीज वितरण कार्यालयासमोर शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_
✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी, दि-३०ऑगस्ट :-
चिखलव्हाळ येथील बेरड समाजाच्या वस्ती मध्ये स्वातंत्र्यानंतर गेल्या वर्षी प्रथमच वीज पोहोचली होती. मात्र या वर्षीच्या पावसात वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने गेल्या तीन महिन्यापासून या वाडीवर वीज पुरवठा खंडित आहे. वीज वितरण चे स्थानिक कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून देखील मोठ्या स्वरूपाच्या तांत्रिक बिघाडामुळे हा विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याचे निदर्शनास आले. ग्रामपंचायत च्या वतीने वारंवार याची कल्पना विज वितरण विभागाला देऊनही वीज वितरण विभागाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज शिवसेना शाखाप्रमुख रुपेश गावडे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत सदस्य अभिजीत आत्माराम मेस्त्री, सिताराम नामदेव चव्हाण, मेघा महादेव मेस्त्री, विजय नारायण गावडे, वैष्णवी वसंत गावडे या ग्रामपंचायत सदस्यांनी लेखी निवेदन सावंतवाडी येथील वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. चार दिवसात हा वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास समस्त बेरड समाज वीज वितरण च्या कार्यालयासमोर आंदोलन करेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी संबधित अधिकाऱ्यांनी पुरेसे मनुष्यबळ व कर्मचारी देऊन दोन दिवसात हा विद्युत पुरवठा सुरळीत करणार असल्याचे आश्वासन शिवसेनेचे या शिष्टमंडळाला दिले.
कर_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

