नेत्रावती एक्स्प्रेस आणि मत्सगंधा एक्स्प्रेस या दोन रेल्वे गाड्या कणकवलीमध्ये थांबाव्यात अशी कणकवलीकरांची मागणी…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव
🎴कणकवली : दि. ३० नेत्रावती एक्स्प्रेस आणि मत्सगंधा एक्स्प्रेस या दोन रेल्वे गाड्या कणकवलीमध्ये थांबत नसल्याने, कणकवली आणि कणकवली शहरापासून जवळ असलेल्या गावातील नागरिकांची गैरसोय होत आहे. या दोंन्ही गाड्या व इतरही सर्वच गाड्या कणकवली रेल्वे स्टेशनवर थांबाव्यात अशी मागणी कणकवली आणि कणकवली शहरापासून जवळ असलेल्या गावातील नागरिक करत आहेत.
नेत्रावतु एक्स्प्रेस आणि मत्सगंधा एक्स्प्रेस या दोन रेल्वे गाड्या रत्नागिरी येथे थांबत आहेत, नंतर त्या कुडाळ येथे थांबत असल्याने बाकी गावातील नागरिकांना रत्नागिरीवरून दुसरी ट्रेन किंवा बस पकडुन आपल्या गावाचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी दमछाक होत आहे. कुडाळ येथे थांबत असल्याने, कणकवली मधील नागरिकांना पुन्हा कुडाळवरून मागे यावे लागत आहे.
नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष घातले पाहिजे आणि कणकवली व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता. त्यांची मागणी मान्य करत, सर्वच रेल्वे गाड्या कणकवली स्टेशनवर थांबाव्यात.

