🛑 कुडाळ तालुक्यात लसीकरणासाठी झुंबड..
🛑 अनेक नागरिक माघारी..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२२ :- कुडाळ तालुक्यातील 26 लसीकरण केंद्रावर शनिवारी कोव्हिशिल्ड लसीचे जिल्ह्यात 3960 डोस उपलब्ध करण्यात आले तरीही बहुतांशी नागरिकांना लस न घेतात परत जावे लागले कुडाळ तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रावर नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली उपलब्ध झालेल्या डोसचे दुप्पट नागरिकांची गर्दी झाली काही लसीकरण केंद्रावर तर पहाटे पाच वाजल्यापासून नागरिकांनी हजेरी लावत रांगा लावल्या मात्र उपलब्ध लस त्यानुसार ऑफलाइन नोंदणी अंतर्गत टोकन दिलेल्या आणि ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना लस मिळाली उर्वरित नागरिकांना मागे परतावे लागले दरम्यान काही लसीकरण केंद्रावर एकच गर्दी झाल्याने आणि आरोग्य प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने काहीसा गोंधळ उडाला होता कुडाळ तालुक्यातील शनिवारी 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कोव्हिडशिल्ड लसीचे पहिल्या व दुसऱ्या दिवसासाठी लसीकरण सत्र आरोग्य प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते ओरोस जिल्हा रुग्णालय कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे प्रत्येकी तीनशे उपलब्ध करण्यात आले होते तर कडावल कसाल पणदूर हिर्लोक माणगाव वालावल या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत प्रत्येक 560 डोस याप्रमाणे डोस उपलब्ध करण्यात आले यात प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येकी 140 तर घोडगे हुमरमळा वाडीवरवडे घावनळे आकेरी आंदुरर्ले भडगाव बुद्रुक आणाव सोनवडे तर्फे हवेली पावशी उपवडे तेंडोली पिंगुळी जांभवडे गावराई रांगणा तुळसुली नेरूर कर्याद नारुर पाट या ठिकाणी प्रत्येकी 140 उपलब्ध करण्यात आले होते यात पहिल्या व दुसऱ्या डोस साठी कोटा ठरवून देण्यात आला होता दुसर्या डोस साठी पात्र नागरिकांनाही प्राधान्य देण्यात आले होते शहरी भागात 50 टक्के ऑफलाईन व 50 टक्के ऑनलाईन तर ग्रामीण भागात दहा टक्के ऑनलाईन व 90 टक्के ऑफलाईन नोंदणीसाठी व्यवस्था करण्यात आली होती ऑनलाईन नोंदणीसाठी शुक्रवारी रात्री उशिरा सुरू करण्यात आली काही तर संध्याकाळपासूनच ऑनलाईन नोंदणीसाठी प्रतीक्षेत होते मात्र काही क्षणातच बुकिंग फूल झाले उर्वरित नागरिकांची निराशा झाली यांनी ऑफलाईन लसी करण्यासाठी शनिवारी पहाटेपासून केंद्रावर हजेरी लावली ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील सर्वच लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली काही ठिकाणी तर झुंबड उडाल्याचे चित्र होते उपलब्ध लस साठ्याच्या दुप्पट तिप्पट नागरिकांची केंद्रावर गर्दी झाल्याने काही ठिकाणी गोंधळी निर्माण झाला बहुतांशी केंद्रावर तर पहाटेपासून नागरिकांनी रांगा लावल्या होते उपलब्ध खोट्या नुसार ऑनलाईन नोंदणी अंतर्गत नागरिकांना वाटप करण्यात आले यानुसार यांना लस टोचण्यात आली ऑनलाईन नोंदणील्या नोंदणी झालेल्यांना लस मिळाली मात्र ऑफलाइन आणि ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित नागरिकांना परत मागे जावे लागले यात पहाटेपासून केंद्रावर आलेल्या नागरिकांचाही समावेश होता या ज्येष्ठ नागरिकांची परवड झाली लस साठा संपल्याचे सांगण्यात आल्याने नागरिकांनी ही लस न घेतात नाराजी व्यक्त करीत घरची वाट धरली काही ठिकाणी नागरिकांनी संबंधित आरोग्य यंत्रणेला जाब विचारला पुरेसा साठा उपलब्ध करावा लसीकरणात सुसूत्रता आणून योग्य नियोजन करावे आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी या वेळी नागरिकांनी केली मात्र गर्दी झाल्याने आरोग्य प्रशासनातही चांगली तारांबळ उडाली त्यामुळे येथे कोरोनाचे नियमांचा फज्जा उडाला होता. शुक्रवारी लस उपलब्ध करून तालुक्यात लसीकरण घेण्यात आले होते त्यावेळी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी झाली होती .
………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

