कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 बांदा-दोडामार्ग रस्त्याची दुरुस्ती गणेश चतुर्थी पुर्वी न केल्यास जन आंदोलनाचा भाजप तालुका उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांचा इशारा..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : संजय भाईप

🎴सावंतवाडी, दि-२२ :- बांदा-दोडामार्ग रस्ता डांबरीकरणाचे काम डिसेंबर महिन्यात करण्यात येईल. गणेश चतुर्थी पूर्वी पावसाळी डांबर वापरून तातडीने खड्डे बुजविण्यात येतील असे कार्यकारी अभियंता छाया नाईक यांनी लेखी दिले होते. परंतु एक आठवडा उलटून गेला तरी पावसाळी डांबराने भरण्यात येणारे खड्डे अद्याप भरले नसल्याने जन आंदोलनाचा इशारा भाजप तालुका उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी प्रसिद्ध पत्रकातून कळवले आहे.

 

बांदा-दोडामार्ग हा रस्ता दुरुस्ती व्हावा यासाठी अनेकवेळा भाजप पक्षाने आंदोलने केली होती .परंतु याची पालकमंत्री आणि प्रशासनाने अद्याप पर्यंत दखल घेतली नसल्याने आठवड्यापुर्वी भाजपाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी कार्यकारी अभियंता छाया नाईक यांनी लेखी आश्वासन दिले होते.

कोकणातील सर्वांत मोठा असा गणेश चतुर्थी चा सण तोंडावर आला आहे आणि अशा वेळी बांदा-दोडामार्ग रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. गणेश मुर्ती पण याच रस्त्यावरून वाहन करुन घरी नेण्यात येणार आहेत परंतु खड्डे अजुन बुजवण्यात आले नसल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागणार आहे. आंदोलनाच्या वेळी सावंतवाडी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी आंदोलन स्थळी भेट दिली होती. सदर रस्ता मंजूर असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात रस्त्याच्या डांबरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. आणि त्यापूर्वी पावसाळी डांबर खड्डे तातडीने भरण्याचे आश्वासन आश्वासनाची पूर्तता न झाल्यास गणेशोत्सवापूर्वी जन आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप सावंतवाडी उपाध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी दिला आहे. यावेळी निलेश पटेकर, विकी कदम, संदेश महाले उपस्थित होते.

 

*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*

 

_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._

_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_

 

_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_

*पेडणेकर सायकल कंपनी*

_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_

 

🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध

 

*🚴🏻‍♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻‍♀️*

 

💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध

☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल

 

 

*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*

 

अटी व नियम लागू

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!