पर्यटन व्यावसायिक जपताहेत कोकणच्या विकासाचा वसा*
*जेष्ठ संपादक सुकृत खांडेकर यांचे गौरवोद्गार*
*🛑व्यावसायिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : राहुल गायकवाड*
*🎴सावंतवाडी, दि- :-१६ऑगस्ट*
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाच्या माध्यमातून पर्यटन व्यावसायिक संघटितपणे एकत्र येऊन जिल्ह्याच्या पर्यटनवृद्धीसाठी करीत असलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. कोकणच्या विकासाचा वसा घेतल्यासारखे काम तुम्ही करीत आहात, याच ऊर्जेतून या जिल्ह्याला समृद्धी मिळेल. त्यामुळे पत्रकार या नात्याने तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवून तुम्हाला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करू, असा विश्वास जेष्ठ संपादक सुकृत खांडेकर यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी तालुका पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे पर्यटन या विषयावर माजगाव येथील डि के टुरिझम सभागृहात चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना ज्येष्ठ संपादक तथा राजकीय विश्लेषक सुकृत खांडेकर यांनी पर्यटन विषयक विविध पैलू उलगडले.
यावेळी सावंतवाडी तालुका पर्यटन महासंघाचे अध्यक्ष जितू पंडित, जिल्हा पर्यटन महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, जिल्हा सचिव ॲड. नकुल पार्सेकर, जिल्हा उपाध्यक्ष डि के सावंत, तालुका सदस्य बाबल वाडकर, सत्यम सावंत, परवेज सय्यद, राजन नाईक, नंदू तारी, राजेश लाड, माजगाव उपसरपंच संजय कानसे, इन्सुली उपसरपंच रामचंद्र चराठकर आदींसह पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
राज्यात पर्यटनावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो मात्र पर्यटन व्यावसायिकांना त्याचा कोणताही फायदा होत नाही. पर्यटनाशी संबंधित शासकीय यंत्रणाच त्याचा अधिक फायदा घेतात. या भ्रष्टाचाराला लगाम घातला तरच विकासाला चालना मिळू शकेल. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांनी संघटितपणे काम केल्यास जिल्ह्याच्या पर्यटन वाढीस त्याचा नक्कीच फायदा होईल. या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ करीत असलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सुकृत खांडेकर यांनी काढले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज तिसऱ्या लाटेची टांगती तलवार सर्व व्यवसायिकांसमोर आहे. मात्र, बंद – लॉकडाऊन हा कोणत्याही बाबीवरचा उपाय नाही. राजकारण्यांचे दौरे सुरू आहेत मात्र सर्वसामान्य यात होरपळला जात आहे. खरे तर स्वतःची काळजी घेऊन काम करणाऱ्यांना ताकद देण्याचे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र, लॉकडाऊनच्या नावाखाली व्यवसायिकांना चिरडण्याचेच काम दुर्दैवाने होत आहे. यातून उभारी घेण्यासाठी तुमची संघटित ताकदच कामाला येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सावंतवाडीचे आणि माझे संबंध कौटुंबिक व जिव्हाळ्याचे आहेत. मी लहान असताना वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने आम्ही खासकिलवाड्यात राहायचो. तेव्हापासून मला या भागाची आत्मीयता आहे. सतीश पाटणकर हा माझा मागील पंधरा वर्षांपासूनचा मित्र. मंत्रालयात असला तरी कोकणचं कसं भलं होईल यासाठी त्याची नेहमी तळमळ असे. जणू सावंतवाडी ने मंत्रालयात आपला दूत म्हणून सतीशला पाठविले आहे अशा पद्धतीने तो काम करायचा, अशा शब्दात सुकृत खांडेकर यांनी जिल्हा पर्यटन महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर यांचा गौरव केला.
या पर्यटन चर्चासत्राचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष सतीश पाटणकर यांनी केले. व्यापार्यांची एकजूट हीच पर्यटनाची खरी ताकद असून सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच लहान-सहान सर्व व्यापारी व उद्योजकांनी एमएसएमईचे रजिस्ट्रेशन तात्काळ करावे, असे आवाहनही त्यांनी उपस्थित व्यवसायिकांना केले. तर महासंघाचे सचिव डी के सावंत यांनी एमटीडीसीसारख्या राज्याच्या पर्यटन विषयक यंत्रणामधील काळाबाजार व शासनाच्या पैशांचा अपव्यय व्यक्त केला. आज जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांनी केवळ ध्येय म्हणून आपला व्यवसाय सुरू ठेवला असून याला उभारी येण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे स्वागत जिल्हा सचिव ॲड. नकुल पार्सेकर यांनी तर आभार तालुकाध्यक्ष जितू पंडित यांनी मानले. यावेळी संघटनेच्यावतीने ज्येष्ठ संपादक सुकृत खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या रूपाने तुमचा हक्काचा माणूस दिल्लीत बसला आहे. तुम्ही जे मागाल त्यापेक्षा ते दुप्पट देतील याचा आम्हाला विश्वास आहे. प्रशासनाला धाक असणारे शरद पवारांनंतरचे राणे हे दुसरे नेते आहेत. जो विषय हाती घेतात त्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून तो तडीला नेण्याचे कसब त्यांच्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून त्यांनीच जाहीर केला आहे. त्यामुळे या जिल्ह्याला पर्यटनातून समृद्धी प्राप्त करण्यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी संघटितपणे पाठपुरावा केल्यास ना. राणे तुमचे प्रश्न नक्कीच मार्गी लावतील असा विश्वास ज्येष्ठ संपादक सुकृत खांडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

