🛑 मनसे कडून पूरग्रस्तांना मदतकार्य..
🛑 कुडाळ तालुक्यातील बिबवणे,पिंगुळी, नानेली,साळगाव, पावशी,बाव आदी गावांचा समावेश..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर
🎴कुडाळ,दि-११ :- दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुक्याच्या वतीने तालुक्यातील पूरग्रस्तांना अन्नधान्य स्वरूपात मदत कार्य करण्यात आले. अलीकडेच झालेल्या महापुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होऊन पूरग्रस्तांचे प्रचंड नुकसान झालेले होते.त्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समस्त महाराष्ट्र सैनिकांना पूरग्रस्त जनतेची भेट घेऊन त्यांची सेवा करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज तालुक्यातील बाव, पिंगुळी, बिबवणे,नानेली, साळगाव, पावशी आदी गावातील पूरग्रस्त भागात भेट देऊन मनसेने मदत कार्य केले. यावेळी पूरग्रस्तांनी आपत्ती प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या भावना महाराष्ट्र सैनिकांचा मांडल्या. पूरसदृश्य परिस्थितीची हवामान खात्याकडून आगावू निदान 24 तास अगोदर पूर्वकल्पना दिली गेल्यास घरातील साहित्य व इतर गोष्टींची हलवाहलव करून नुकसानी टाळता येईल मात्र प्रशासनाकडून व आपत्ती विभागाकडून यावेळी पूर्वकल्पना दिली नसल्याने प्रचंड वित्तहानी झाल्याची तीव्र भावना पूरग्रस्तांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना समोर मांडली.तांदूळ,तूरडाळ,कांदे,बटाटे,
साखर,चहा पावडर,लक्स साबण,व्हील साबण,मीठ,बिस्कीट,कोलगेट आदी घटकांचे किट मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुरग्रस्तांसाठी भेट स्वरूपात दिले.यावेळी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,राजेश टंगसाळी, बाबल गावडे,कुणाल किनळेकर,दिपक गावडे,अविनाश अणावकर,सचिन सावंत,सुंदर गावडे,गुरू मर्गज,श्रीपाद अडसुळे,रामा सावंत,वैभव परब,वैभव धुरी,अविराज धुरी यांसह अनेक पदाधिकारी सेवकार्यात उपस्थित होते.


changle kaam
manse👍👍👍⛳⛳⛳⛳⛳⛳