आज जिल्ह्यात नवीन १०८ रुग्ण आढळले कोरोना पाँझिटिव्ह
*आज जिल्ह्यात नवीन १०८ रुग्ण आढळले कोरोना पाँझिटिव्ह*
सिंधुदुर्ग, दि.१०:- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 46 हजार 174 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 58 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 108 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

