Skip to content
- सावंतवाडी तहसीलदार यांनी सहस्त्रा कंपनीला माती उत्खनन बाबत १९ लाख रुपये दंडाचा दिलेला आदेश रद्द केला म्हणून सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांनी उपोषणाचा इशारा दिला होता व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाचा महसूल बुडवला म्हणून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा चालविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती, अखेर सावंतवाडी तहसीलदार म्हात्रे यांनी तो १९ लाख रुपये दंड आदेश वेत्ये येथील सर्वे नंबर १०२/१५ मध्ये झाल्याचे पहाणी वरून आढळून आल्याने या या जमिनीचे मालक कृष्णा कुडणेकर यांना १९ लाख रुपये दंड ठोठावून तो पंधरा दिवसात भरण्याचे आदेश दिले आहेत, महेश सावंत यांनी सदर चा दंड पंधरा दिवसात वसूल न केल्यास पुन्हा उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की वेत्ये येथील सहस्त्रा कंपनीने बेकायदेशीर माती उत्खनन केल्याची तक्रार महेश सावंत यांनी केली होती, त्यानुसार रीतसर पंचनामे करून सदरच्या कंपनीला १९लाखाचा दंड आकारण्यात आला होता, मात्र तो दंड तहसीलदार सावंतवाडी यांनी माफ केल्याने सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांनी याविरुद्ध प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागत संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाचा महसूल बुडविला म्हणून गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागून उपोषणाचा इशारा दिला होता.
महेश सावंत यांच्या उपोषणाची दखल घेऊन ज्या जागेत माती उत्खनन झाले ती जागा कृष्णा कुडणेकर यांच्या मालकीची असल्याने त्यांच्याकडून १९ लाख रुपये दंड वसूल करण्यात येईल असे पत्र महेश सावंत यांना दिल्याने महेश सावंत यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे ,आहे व हा दंड येत्या पंधरा दिवसात वसूल न केल्यास पुन्हा उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.
error: Content is protected !!