▪️सोनुर्ली ( पाक्याचीवाडी ) येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा घालून दिला नवा आदर्श
*▪️सोनुर्ली ( पाक्याचीवाडी ) येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा घालून दिला नवा आदर्श*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ब्यूरो न्यूज :*
*🎴सावंतवाडी, दि- :-४ऑगस्ट*
सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणाऱ्या सोनुर्ली ( पाक्याचीवाडी ) येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा आता नवा आदर्श घालून देत 23 जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदीच्या महापुरा मध्ये नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
सह्याद्रीच्या कुशीतून वाहणाऱ्या तेरेखोल नदीला 23 जुलै रोजी महापूर आला आणि या महापुरा मध्ये नदी तीरावरील गावांना जोरदार फटका बसतांना त्यांच्या घरामध्ये पुराचे पाणी जाऊन कधी न भरून येणारे अपरिमित असे नुकसान झाले. पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात पिकऊन घरात ठेवलेले धान्य, भांडीकुंडी,कपडालत्ता, किमती वस्तू आधी सर्व पाण्यात भिजून गेले, नुकसानीची दाहकता पाहून अनेक संस्था, मंडळे,राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते या नुकसानग्रस्तांच्या मदतीला धावले अनेकांनी आपापल्या परीने नुकसानग्रस्तचे अश्रू पुसण्यासाठी प्रयत्न केले, सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील नवयुवक कला-क्रीडा मंडळाकडूनही या नुकसानग्रस्तांना मदत म्हणून खारीचा वाटा उचलण्याचा आला, या मंडळाच्या माध्यमातून विविध संस्था तसेच दानशूर व्यक्तीनी केलेल्या तब्बल 50 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीमधून जीवनावश्यक वस्तू मदत देण्यात आली.
इन्सुली,ओटवणे,वाफोली बांदा,सरमळे,विलवडे या भागातील 56 कुटुंबाना ही मदत वाटप करण्यात आली.या भागामध्ये अनेकांकडून मदतीचा ओघ सुरू आहे मात्र अद्याप पर्यंत ज्यांना मदत पोहोचलेली आहे अशांना मंडळाच्या माध्यमातून मदत पोचवण्याचा भार मंडळाच्या सदस्यानी उचलला, मंडळाने केलेली ही मदत स्वीकारतांना अनेकांनी आनंदाश्रू काढत मंडळाच्या कार्याचे कौतुक केले
यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष ओटवणेकर, सत्यवान हिराप, सचिन साळगावकर,सत्यवान नाईक, दाजी अणावकर, सदू मसुरकर, अमोल सावंत,राजन मठकर आधी उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🧎🏃♂️💪🏻आपले आरोग्य कसे तंदुरुस्त ठेवाल??आपण कसे निरोगी राहाल???कोरोना काळात कशी स्वतःची काळजी घ्याल??…सर्वाची उत्तरे आम्ही देणार…💪🏻🏃♂️🧎*_
*▪️दररोज सकाळी आणि संध्याकाळी ८ वाजता आरोग्याविषयी अमूल्य आणि मोफत मार्गदर्शन…*
♦️ *आहाराच्या माध्यमातून आरोग्याच्या तक्रारी कशा कमी कराव्यात?*
♦️ *शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांची कमी कशी भरून काढावी?*
♦️ *आपल्या उंची नुसार आपले वजन कसे वाढवावे अथवा कमी करावे?*
♦️ *शरीरातील चरबी मुळापासून कशी नष्ट करावी?*
♦️ *लहान मुलांचे आरोग्य कसे जपावे?*
♦️ *केवळ शारीरिकरित्या नाही तर मानसिकरित्या आरोग्य कसे चांगले ठेवावे?*
👉🏻 *अश्या अनेक विषयांवर मोफत मार्गदर्शन…*
*===========================*
*फक्त खालील लिंकवर एक क्लिक करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा !*
https://chat.whatsapp.com/LRWSOjnLutdCsO3banf632
संपर्क:-7887880208
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*