दक्षिण कोकणचे पंढरपूर समजला जाणाऱ्या श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी
*_🛑 दक्षिण कोकणचे पंढरपूर समजला जाणाऱ्या श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी*
*_🛑 मंदिराचा परिसर गेला भाविकांनी फुलून.. लोटांगण साठी जत्रा प्रसिद्ध*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*
*🎴सावंतवाडी,दि,:-२० नोव्हेंबर*
राज्यातील लोटांगण जत्रोत्सव म्हूणन प्रसिद्ध असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या व दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणा-या सोनुर्ली येथील श्री देवी सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव आज संपन्न होत आहे. लाखो भक्तांची माय माऊली असणाऱ्या सोनुर्ली माऊलीच्या चरणी आज भक्तगण लिन झाले . मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून सकाळी रीतीरिवाज प्रमाणे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर भक्तगण यांना दर्शनासाठी सोडण्यात आले. भक्ताची गर्दी अलोट होत असल्याने सकाळपासून सोनुर्ली माऊली देवस्थान कमिटी व पोलीस प्रशासनने योग्य नियोजन केले होते, यावेळी मंदिर परिसर वाढविल्यामुळे भक्ताची होणारी गर्दी नियंत्रणात आली.
मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल, स्टोल्स जत्रेला लागले आहेत. मोठ्या प्रमाणात ओट्या भरण्याचा कार्यक्रम सुरु होता. सकाळपासून भक्ताची रीघ लागली होती, तसेच एसटी वाहतूक बंद असल्याने व पाऊस यामुळे थोडा परिणाम व्यापारी वर्गावर झाला. दक्षिण कोकणचे आराध्य दैवत म्हणून श्री देवी सोनुर्ली माऊलीची ओळख आहे. या देवीचा वार्षिक जत्रोसव म्हटले की सिंधुदुर्ग जिल्हा भक्तगणांबरोबरच गोवा, कर्नाटक, बेळगाव, मुंबई, कोल्हापूर तसेच अन्य राज्यातून लाखो भाविक या देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाला दर्शनासाठी आले होते. माऊली देवीचे भव्यदिव्य मंदिर भक्तगणांच्या सहकार्यातून उभारण्यात आले आहे. त्यामुळे भक्तगण याना सुलभ दर्शन घेता आले. देवीचे मंदिर उत्तम प्रकारे सजविले होते तसेच देवीची मूर्ती सुद्धा सजविण्यात आली होती.
कोरोना प्रदुर्भाव अजून कमी न झाल्याने यावर्षी कोरोना संबधीचे सर्व नियम पाळून हा जत्रोत्सव साजरा केला जात आहे भक्तगण यांनी पूर्ण सहकार्य देवस्थान कमिटीस केले आहे . जत्रोत्सवाला लाखो भाविकांची गर्दी असली तरी अतिशय शांततामय वातावरणात हा सोहळा सुरु आहे. सोनुर्ली जत्रोत्सवाला लाखो भाविकांचा जनसागर लोटला होता. मोठ्या स्वरूपात खरेदी-विक्री होते. एसटी महामंडळाच्या बसेस आणि खासगी वाहनांतून लाखो भाविक गर्दी करतात. जत्रोत्सवाचे विलक्षण दृष्य पाहण्यासाठी या भक्तांनी गर्दी केली होती. देवीच्या मंदिराचा झगमगाट, देवीचे सुखमय दर्शन डोळ्यात साठवून भाविक भारावून जातात.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🤩धमाका आँफर..🤩धमाका आँफर..🤩धमाका आँफर..*
🎉दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडीतील प्रसिद्ध *Raut and Company* आणि *Rovastra* ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत
*😍धमाका आँफर😍*
_🤩वेळ दवडू नका आजच राऊत अँड कंपनी आणि रोवस्त्र ह्या दालनाला भेट द्या🤩_
_*🛑राऊत अँड कंपनी मध्ये कपडे खरेदी करा, आणि मिळवा २०% पर्यंत सूट..!*_
*_🟡रोवस्त्र मध्ये कपडे खरेदी करा, आणि मिळवा तब्बल ५०% पर्यंत सूट..!_*
(आँफर फक्त मर्यादित दिवसांसाठी)
*🏤आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग, गांधी चौक, ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग ४१६५१०
*🎴संपर्क:-*
02363272709 ,272254
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*