सिंधुदुर्गनगरी पोलिसांची दमदार कामगिरी
*🛑मोबाईल चोर परप्रांतीय 24 तासात सिंधुदुर्गनगरी पोलिसांच्या जाळ्यात*
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि- :-४ऑगस्ट*
स्त्रीयांचे कापड पीस विक्रीसाठी आलेल्या एका परप्रांतीयाने चक्क मोबाईल चारून नेला. चोरण्यात आलेला मोबाईल अंगणवाडी सेविकेचा असल्याने तिने तात्काळ सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. २ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेची गंभीर दखल सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी घेत ताबडतोब चक्रे फिरविली. आज अशाप्रकारे घरोघरी विक्री करण्यास फिरणाऱ्या सात ते आठ विक्रेत्यांना पोलीस ठाण्यात आणत चौकशी केली. यातील परवेझ नावाच्या विक्रेत्याने आपण मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले असून अवघ्या २४ तासांत चोरीचा तपास लावला. यामुळे सिंधुदुर्गनगरी पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे यांची हद्दीत एका अंगणवाडी सेविकेच्या घरातून त्यांचा शासकीय कर्तव्य करीता देण्यात आलेला मोबाईल स्त्रियांचे कापड पीस विकणारी परप्रांतीय व्यक्तीने घरातून काल २ ऑगस्ट रोजी चोरून नेला. याबाबत सिंधुदुर्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अमित यादव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गीते, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक जयवंत वारा, सहाय्यक पोलिस फौजदार जाधव, सहाय्यक पोलीस फौजदार गोसावी,पोलीस नाईक गवस असे मिळून शोध तपास करत होते. ३ ऑगस्ट रोजी गोपनीय माहितीनुसार गुन्ह्याचे तपास करताना गस्त करत रानबांबुळी, ओरोस, कसाल, पडवे हा परिसर पिंजून काढला. पोलीस उपनिरीक्षक अमित गीते, जयवंत वारा, स पो फौ जाधव आणि गोसावी यांनी गस्ती दरम्यान सर्व संशयित आरोपीना पकडून पोलीस ठाण्यात आणले. चौकशी दरम्यान त्यातील परवेझ नावाच्या आरोपीने त्या अंगणवाडी सेविका यांचे घरातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली आहे. पोलीस ठाणे येथे आरोपीची अटक प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सहाय्यक फौजदार जाधव व पोलीस नाईक गवस करीत आहेत. पोलिसांनी जलद गतीने केलेल्या यशस्वी तपासाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

