🛑 जानवली नदीपुलानजीक कंटेनर पलटी ; चालक ठार
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-०२ :- गोव्याहून पनवेल च्या दिशेने जाणारा कंटेनर कणकवली शहरालगत जानवली नदीपुलानजीक पलटी होऊन झालेल्या अपघातात कंटेनर चालक ठार झाला. महेंद्र भोसले (वय 45 रा. बीभळी, ता.फलटण, सातारा ) असे मृत चालकाचे नाव आहे. कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर नॅशनल हायवेच्या डिव्हायडरवर चढला आणि पलटी झाला. पलटलेल्या कंटेनरखाली चालक महेंद्र भोसले सापडला आणि ठार झाला. आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातस्थळी वाहतूक पोलीस संदेश अबीटकर, वैभव कोळी यांनी तात्काळ धाव घेतली.

