कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

संपूर्ण महाराष्ट्र सर्कलमध्ये सिंधुदुर्ग डाकघर विभाग अव्वल…….अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभाग यांच्याकडून शुभेच्छा…

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
_अचूक बातमी थेट हल्ला_

✍️ प्रतिनिधी :अजय भाईप

🎴सावंतवाडी, दि-३०जूलै :-भारतीय डाक विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक २७/७/२०२१ आणि २८/७/२०२१ रोजी टपाल जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण टपाल टपाल जीवन विमा (RPLI) महालॉगिन आयोजित करण्यात आले होते. या नियोजित विशेष मोहिमेत टपाल जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण टपाल टपाल जीवन विमा (RPLI) च्या जास्तीत जास्त नवीन पॉलीसी उघडण्याचे उद्दिष्ट राज्यातील सर्व टपाल विभागांना देण्यात आले होते. ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) महा-लॉगिन रोजी म्हणजेच दिनांक २८/७/२०२१ रोजी केवळ एका दिवसात सिंधुदुर्ग डाक विभागात ग्रामीण डाक जीवन विम्याचे (RPLI) चे तब्बल १९१ नविन प्रस्ताव आणि ६ लाख ८९ हजार ६६९ एवढा नविन प्रिमियम जमा करण्यात आला. या विशेष मोहिमेच्या पार्श्वभूमीवर विभागातील सर्व टपाल कर्मचाऱ्यांनी सर्व स्तरावरून अथक परिश्रम घेऊन ग्रामीण डाक जीवन विम्याच्या जास्तीत जास्त नवीन पॉलिसी तसेच अधिकाधिक नवीन प्रीमियम जमा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सर्वांनी या मोहिमेसाठी मोठे योगदान दिल्याने संपूर्ण महाराष्ट्र सर्कलमध्ये सिंधुदुर्ग डाक विभागाने पहिल्या क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळवला आहे.
या बद्दल बोलताना अधिक्षक डाकघर सिंधुदुर्ग डाक विभाग श्री. आ.ब. कोड्डा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, जिल्ह्यातील सर्व टपाल कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले तसेच विभागाच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देऊन, सिंधुदुर्ग विभाग उत्तरोत्तर अशीच प्रगती राहील अशी आशा व्यक्त केली. त्याचप्रमाणे भारतीय डाक विभागाच्या टपाल जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण टपाल टपाल जीवन विमा (RPLI) या वीमा योजनांचा जिल्ह्यातील सर्व जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.

_*🏃‍♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃‍♂️*_

*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*

*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*

*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*

*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!