🛑 रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंट्रल तर्फे आनंदाश्रय अणाव येथील कोरोना रुग्णांची तपासणी..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२८ :- आठ दिवसापूर्वी अणाव येथील वृद्धाश्रमात कोरोनाचे रुग्ण आढळले होते जवळपास 20 जनांना कोरोनाचा संसर्ग झाला होता . शासकीय यंत्रणा आणि खाजगी संस्थांनी वेळीच मदत व औषध उपचार केले होते काही रुग्णांना कोव्हीड सेंटर मध्ये दाखल करण्यात आलं होतं सध्या 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत .सामाजिक बांधिलकीतून रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंटर यांनी पुढाकार घेत क्लबचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत कोलते यांनी सर्व रुग्णांची मोफत तपासणी केली व उपचार केले रोटरी डॉक्टर वैभव आईर यांनी परिचारिकांना औषधसंबंधी मार्गदर्शन केले .क्लबचे सचिव उदयकुमार जांभवडेकर यांच्या हस्ते सॅनिटायझर, मास्क व ग्लोज देण्यात आले .त्यावेळी आश्रमाचे संचालक बबनकाका परब उपस्थित होते .त्यांनी या उपक्रमाबद्दल रोटरी क्लब सिंधुदुर्गचे आभार मानले.

