कृषिकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 कलंबिस्त गावत गवारेड्यांकडून मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान..

🛑 नुकसानीचे ठोस पंचनामे करा ; राष्ट्रवादीची मागणी..

🛑 शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही ; उपवनसंरक्षकांचा शब्द…

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-२८:- कलंबिस्त गावत गवारेड्यांकडून मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र पंचनाम्यातील त्रुटींमुळे शेतकऱ्यांना नुकसानीपोटीचा योग्य मोबदला मिळाला नाही.त्यामुळे झालेल्या नुकसानीचे ठोस पंचनामे करा, अशी मागणी आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे. याबाबत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कुठल्याच शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा शब्द श्री. नारनवर यांनी उपस्थितांना दिला. यावेळी अबीद नाईक, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा रेवती राणे, रिद्धी परब,कुडाळ माजी उपसभापती आर. के. सावंत, बाबू सावंत, दिलिप वरणें, शेतकरी चंद्रकांत सावंत, विश्वजित सावंत आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!