कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राजापूरची चिपळूण पूरग्रस्तांना मदत..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

 ✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

🎴राजापूर दि. २८ :- सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या आसमानी संकटामुळे सगळ्यांच्याच जीवनावर विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसत आहेत. त्यात अतिवृष्टीमुळे चिपळूण येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व मानवतावादी संघटना एकवटून मदत कार्य करत आहेत. याच गोष्टीला अनुसरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने प्रार्थनेसोबत प्रयत्नांवर भर देऊन मदत कार्य सुरू केले आहे.

याचवेळी राजापुर येथील देवाचेगोठणे (पाटवाडी) गावातील एक अभाविप कार्यकर्ता प्रीती शिंदे हिने आपल्या अथक प्रयत्नांनी चिपळूणला मदतीचा हात दिला आहे. ह्यासाठी तिने संपूर्ण देवाचे गोठणे (पाटवाडी) येथील ग्रामस्थांना एकत्र करून नित्य गरजेचे सामान चिपळूणला पाठवण्यासाठी प्रेरित केले. तांदूळ, पीठ, कपडे, सुका खाऊ अशा गोष्टी जमा केल्या. वाडीतील ग्रामस्थांचे पूर्णपणे सहकार्य तिला लाभले. जमा केलेल्या त्या गोष्टी येत्या दोन दिवसात चिपळूण साठी रवाना केल्या जातील. अभाविप कार्यकर्ता प्रीती शिंदे हिचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!