कोकणशासकीय

उद्या आमदार दीपक केसरकर घेणार बांदा, विलवडे व माडखोल ग्रामपंचायतीत पूरस्थिती बाबत आढावा बैठक..

_*🛑 उद्या आमदार दीपक केसरकर घेणार बांदा, विलवडे व माडखोल ग्रामपंचायतीत पूरस्थिती बाबत आढावा बैठक..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी दि-२७ :-* महाराष्ट्र विधानसभा विशेष हक्क समिती अध्यक्ष आमदार दीपक केसरकर हे उद्या दि.२८ जुलै रोजी बांदा, विलवडे व माडखोल ग्रामपंचायतीत पूरस्थिती बाबत आढावा बैठक घेऊन लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेणार आहेत.
यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे,संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व महसूल यंत्रणा उपस्थित राहील. बांदा ग्रामपंचायती सकाळी १० वाजता बैठक आयोजित करण्यात आली असून तहसीलदार, सरपंच, व्यापारी यांच्या उपस्थितीत पूरस्थिती बाबत आढावा घेण्यात येणार आहे
तसेच सकाळी ११ वाजता विलवडे आणि दुपारी १२ वाजता माडखोल येथील ग्रामपंचायतीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली असून संबंधित ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील पूरस्थितीत झालेल्या नुकसानीबाबत या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!