विलवडेतील नुकसानग्रस्तांना भाजपाकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत…

विलवडेतील नुकसानग्रस्तांना भाजपाकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत…

राजन तेलींच्या हस्ते सरपंचाकडे सुपूर्द; ग्रामस्थांनी मानले आभार…

*बांदा,ता.२४:* विलवडे येथील पूरपरिस्थितीत नुकसान झालेल्या ग्रामस्थांना आज भाजपच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते सरपंच दिनेश दळवी यांच्याकडे या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या.दरम्यान पुरात कोसळलेल्या घरांची श्री.तेली व नगराध्यक्ष संजू परब यांनी पाहणी केली.
यावेळी उपसभापती शितल राऊळ,माजी सभापती रवी मडगावकर,नगरसेवक आनंद नेवगी,बांदा सरपंच अक्रम खान,बंटी पुरोहित,प्रकाश दळवी,परेश धरणे,कृष्णा सावंत,गुणाजी दळवी,प्रवीण दळवी,नंदकिशोर दळवी,प्रभाकर दळवी,नरेंद्र दळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान नुकसानग्रस्तना नुकसान भरपाई मिळवून देणार आहे.तसेच आपल्याला जे सहकार्य लागेल ते आम्ही तुम्हाला करू,असा शब्द श्री तेली यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिला.यावेळी जीवनावश्यक वस्तू दिल्या बद्धल उपस्थित ग्रामस्थांनी श्री तेली यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!