सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावातील तेरेखोल नदीची पातळी अचानक वाढल्याने अर्धा गाव पाण्याखाली
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी:-अंकुश नाईक
🎴इन्सुली,दि,२४जूलै:-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असुन अनेक गावे ही पाण्याखाली गेली आहेत,अनेक ठिकाणी रस्ते खचुन,पुलं कोसळुन गावा-गावांचा संपर्क तुटला आहे.सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावात आज पहाटेपासूनच तेरोखोल नदीने धोक्याची पातळी अचानक ओलांडली आणि गावात एकच हाहाकार उडाला,इन्सुली गावातील बिलेवाडी,गावठण,धुरीवाडी,कुडवटेंब,सावंतटेंब आणि डोबवाडी या वाड्यांमध्ये पहाटे सकाळी अचानक पाणी घुसले आणि बघता बघता सगळी घरे बुडु लागली,काही जणांनी घरांच्या टेरेसवर आसरा घेतला तर काही जणांनी घरांच्या छप्पराचा,सकाळचे १० वाजले तरी पाणी वाढतच होते परंतु जिल्हा प्रशासनाकडून कोणीच मदतीस येताना दिसत नव्हते शेवटी उत्कर्ष युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि सावंतवाडी येथुन लाईफ जॅकेट आणि बॅरल बोट आणुन बचाव कार्यास सुरुवात झाली.पुराच्या पाण्यात अडकलेल्या काहीजणांना स्थानिकांकडून मदत मिळाली परंतु काही घरापर्यंत बोटीशिवाय पोहचणे अवघड होते यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ड्रम बोटीच्या सहाय्याने जीवाची बाजी लावत घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.हे सर्व करताना खरी परीक्षा होती ती एकाच घरातील १६ जणांना सुखरूप बाहेर काढण्याची,सभोवताली पाणीच पाणी आणि त्या घरापर्यंत पोहोचायचं तर त्या घरासमोरुन वाहणारा ओहोळ अशावेळी पुन्हा ड्रम बोट पलटण्याची भिती परंतु उत्कर्ष युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयमाने आणि युक्तीने त्या घरातील सोळाही जणांना सुखरूप बाहेर काढले.
*_प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…_*
_इंजिनिअरींगला अँडमिशन सुवर्ण संधी….. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्था *यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक,चराठे, सावंतवाडी*_
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव NBA मानांकनप्राप्त कोर्सेस उपलब्ध असलेले पॉलिटेक्निक
*★ISTE नवी दिल्ली यांनी गौरविलेले सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक*
*★(10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना इंजिनिअरींगला प्रवेश संधी*
*★SC, ST, NT, SBC विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण*
*★OPEN & OBC विद्यार्थ्यांना फी मध्ये 50 % सवलत*
*★कुठलीही प्रवेश परीक्षा नाही NO CET*
*★400 + विद्यार्थ्यांची नामांकीत कंपनीमध्ये नियुक्ती*
*•उपलब्ध अभ्यासक्रम•*
●सिव्हिल इंजीनिअरिंग ●मेकॅनिकल इंजिनिअरिंग ●इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ●कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
*👨🏻🎓💯 % नोकरीची हमी 👩🏻🎓*
*🔸आमची वैशिष्ट्ये:-*
▪️सुसज्ज इमारत ▪️दर्जेदार शिक्षण
▪️अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग
▪️अद्ययावत ग्रंथालय▪️वर्कशॉप
▪️खेळाचे मैदान ▪️व्यायामशाळा
▪️सर्वसुविधायुक्त वसतिगृह ▪️बस सुविधा
▪️२४ तास सुरक्षारक्षक ▪️कॅन्टीन
*🎴संपर्क*
📞02363273535
📞02363273456
📱9421718850
📱9130003477
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

