🛑 पाट हायस्कूलचा निकाल १०० टक्के..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण
🎴कुडाळ, दि-१८ :- कुडाळ तालुक्यातील एस. एल. देसाई विद्यालय पाट चा २०२०-२१ चा शैक्षणिक वर्षाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून एकूण १५३ विद्यार्थ्यांपैकी १५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक कुमारी ज्योती नवसू बुट्टे (४९०/५००) ९८.०० टक्के गुण तर द्वितीय क्रमांक कुमारी रिया दत्ताराम आंबेरकर(४७६/५००) ९५.२० टक्के गुण व कुमार चित्रांग देवदत्त साळगांवकर(४५६/५००) ९१ .२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
त्याचप्रमाणे राज एकनाथ जाधव, दिव्या महेश केरकर व कोमल भानुदास कोचरेकर या तीन्ही विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले.
पाट हायस्कूल शिक्षण संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

