कोकणमहाराष्ट्रराजकीयवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑‌ म्हापण सरपंच अभय ठाकूर यांनी दिल्या आमदार दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..

 

🛑 ‌शांत, सय्यमी, अभ्यासू, दूरदृष्टी असलेले सर्वसामान्यांचे नेते अशा शब्दांत केले आ. दिपक केसरकर यांचे कौतुक..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : ‌समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले, दि-१८ :- ‌म्हापण सरपंच श्री अभय ठाकूर यांनी आमदार दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शांत, सय्यमी, दुरदृष्टी, अभ्यासू सर्व सामन्यांना आपला माणुस वाटणारा नेता म्हणजे आमदार दीपक केसरकर अशा शब्दांत त्यांनी आ. केसरकर यांचे कौतुक केले. आ. केसरकर यांनी राजकिय पटलावर विरोधकांना आपल्या विशिष्ट पद्धतीने हाताळलं व सावंतवाडी- वेंगुर्ला मतदार संघात कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून विकसची गंगा आणली.

म्हापण गावाच्या विकास कामांसाठी जेव्हा जेव्हा आ. केसरकर यांना आम्ही हाक मारतो तेव्हा तेव्हा ते आमाच्या हाकेला प्रतिसाद देत सर्वोतोपरी सहकार्य करतात असे सरपंच अभय ठाकूर म्हणाले. म्हापण गावात आमदार दीपक केसरकर यांच्या सहकार्यातून पार पडलेल्या विकास कामांची यादी त्यांनी पुढीलप्रमाणे सांगितली.

१. म्हापण निवती मुख्यरस्ता ते पागेरेवाडी सोनारघाटी (स्मशानभुमीपर्यंत )रस्ता डांबरीकरण करणे.

२. ग्रामपंचायत म्हापण कार्यालय विस्तारीकरण करणे. ( वरचा मजला)

३. म्हापण वेंगुर्ला मुख्य रस्ता ते मळई रस्ता डांबरीकरण करणे.

४. म्हापण खवणे मुख्य रस्ता ते पागेरेवाडी रस्ता ( नामदेव महारज मठाजवळील) डांबरीकरण करणे.

५. म्हापण निवती रस्ता ते पागेरेवाडी ( तांबळघाटी ) रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.

६. मुख्य रस्ता ते जुनव्हाळवाडी पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.

७. म्हापण खवणे मुख्य रस्ता ते आंबेव्हाळवाडी रस्ता डांबरीकरण करणे.

८. श्री सिद्धेश्वर मंदीर परीसर सुशोभीकरण करणे. ( क वर्ग पर्यटन स्थळ )

अशाप्रकारे म्हापण गावाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या आ. दिपक केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे अशी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!