🛑 दोडामार्ग शहरात शिवसेना – भाजप, आमने -सामने
🛑 पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळला..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१८ :- दोडामार्ग – बांदा या रस्त्याच्या दिपक केसरकर यांच्या वक्तव्यावरून काल हॉट्सअप ग्रुप द्वारे झालेली वैचारीक बाचाबाची आज दोडामार्ग शहरात गांधी चौक येथे शिवसेना – भाजप या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपने – सामने आल्यावर संपली.
शिवसेना – भाजप आपने-सामने आल्यावर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळला.
मात्र झालेल्या ह्या सर्व प्रकारात दोडामार्ग तालुका विकासा साठी किती प्रयत्न चालू आहेत हे आज बाजारात आलेल्या सामान्य माणसाच्या लक्षात आले. एकमेकांची उणी धुणी काढण्या पेक्षा ती उर्जा तालुक्याच्या विकासा साठी वापरा अशी प्रतिक्रिया उपस्थित सामन्य माणसांकडून केली जात आहे.

