कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 सौ.सुहासिनी श्रीधर खोटले हायस्कूल आवारात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१७ :- सौ.सुहासिनी श्रीधर परब,हायस्कूल खोटले व जि, परिषद पुर्ण प्राथ,शाळा या शाळेच्या आवारातील परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन खोटले गावचे सरपंच कमलेश परब,यांच्या उपस्थितीत 15 जुलै रोजी संपन्न झाला. पंचशील ट्रस्ट आदर्शनगर सिंधुदुर्गनगरी ,ओरोस यांच्या वतीने दिवंगत, श्री बलवंत खोटलेकर गुरुजी, ( डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाज भूषण पुरस्कार प्राप्त व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ) यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून ट्रस्टचे अध्यक्ष संजय खोटलेकर यांनी या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी बोलताना संजय खोटलेकर म्हणाले covid-19 च्या महामारीच्या काळात मानवाला आपले शरीर निरोगी राखण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासते.आज मानव निरोगी राहीला तर तो निसर्गाच्या नैसर्गिक हवेचा आपल्या शरीरातील उपयोग करून जगू शकतो. झाडे लाऊन त्यांचे चांगले संगोपन, व जोपासणा केली. तर आजचा मानव निरोगी राहील व कोरोना सारख्या रोगावर मात करेल “झाडे लावणे ती जगवीने” ही काळाची गरज आहे .असा संदेश या वृक्षरोपण कार्यक्रमाच्या संकल्पनेतून करण्यात आला या वृक्षारोपण कार्यक्रमात खोटले, गावचे सरपंच कमलेश परब, हायस्कूलचे पाडवी सर, संदीप परब , तसेच जिल्हा परिषद प्राथ,शाळेचे मुख्याध्यापिका सौ ,आंगणे मॅडम ,कदम मॅडम, व माईणकर सर,तसेच अंगणवाडी सेविका सौ परब ,तसेच आयु,संजय खोटलेकर यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.माईणकर सर यांनी आपल्या जन्म दिनानिमित्त शाळेच्या आवारात झाडे लावली उपस्थितांनी माईणकर सरांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!