कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑 ऑनलाईन शिक्षण आणि मोबाईल मुळे मुलांच्या आरोग्याला विविध धोके..

🛑 ऑनलाईन अभ्यास ठरतो खर्चीक ; पालकांना आर्थिक भुर्दंड..; ऑनलाईन जास्त वापर हानिकारक..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१७ :- कोरोना संक्रमण वाढत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने शाळांचे अध्यापन ऑनलाइन सुरू आहे .शाळा बंद असल्याने मुले घरी असली तरी ऑनलाईन अध्यापनासाठी मोबाईल, लॅपटॉप , टॅब त्यासाठी लागणारी इंटरनेट सेवा त्यामुळे शिक्षण खर्चिक बनले आहे. पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. विद्यार्थ्यांना अवघड पाठ्यक्रम समजण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी राज्य शासनाकडून 1 जुलैपासून सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार करून सेतु अभ्यासक्रमांतर्गत येणारा अभ्यास मोबाईल ग्रुपवर पाठविला जातो मात्र ग्रामीण भागातील अनेक पालकांकडे स्मार्टफोन नाही. तर एकाच घरात एकापेक्षा अधिक विद्यार्थी असल्यामुळे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोरोनामुळे आधीच बजेट कोलमडले आहे . नियमित खर्च सोबत मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईल इंटरनेट याचा खर्च वाढला असून ऑफलाइन पेक्षा ऑनलाइन शिक्षण खर्चिक बनले आहे असे पालकांचे म्हणणे आहे .तसेच सर्वच पालकांना स्मार्टफोन घेणे शक्य होत नाही .अशा मुलांची गैरसोयच होणार आहे .याकडे शासनाने गांभीर्याने पाहून यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. मोबाईलच्या जास्त वापरही मुलांना हानीकारक ठरू शकतो. याकडे लक्ष दिले पाहिजे मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये
यासाठी काही पालक खिशाला परवडत नसताना उसनवारी मोबाईल खरेदी करताना दिसून येत आहेत. मात्र ग्रामीण भागात नेटवर्क समस्या सातत्याने भेडसावत असल्याने दरमहा ठराविक रक्कमेचे रिचार्ज करावे लागते. मात्र नेटवर्क अभावी रिचार्ज वाया जात असल्याने पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आधीच आर्थिक संकटामुळे मेटाकुटीला आलेले पालक पुरते बेजार झाले आहेत. नियमित शाळेचा खर्च आणि आता मोबाईल इंटरनेट अशा नव्याने खर्च वाढला आहे पालक वर्गात मात्र ऑफलाइन शिक्षणापेक्षा ऑनलाइन शिक्षण चांगले महागात पडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!