🛑 कोलगाव हायस्कूल मधील संगणक चोरी केल्याप्रकरणी एकाला काल रात्री अटक..
🛑सावंतवाडी न्यायालयात हजर ; पाच दिवसांची पोलीस कोठडी..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि १६:- कोलगाव हायस्कूल मधील संगणक चोरी केल्याप्रकरणी एकाला काल रात्री उशिरा अटक करण्यात आली. विनोद परशुराम घणके (३०), सध्या रा. कोलगाव, मूळ रा. सांगली, असे त्याचे नाव आहे. दरम्यान त्याला आज येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हा चोरीचा प्रकार १३ जुलैला उघडकीस आला होता. दरम्यान संबंधित प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात संबंधिताने तीन संगणक मिळून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबीला होता. दरम्यान तपासाअंती संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. संशयित हा मूळ सांगली येथील असून सध्या तो कोलगाव तिठा येथे वास्तव्यास आहे. या ठिकाणी तो सेंटरचे काम करतो, याबाबतची माहिती पोलीस महेश पास्ते यांनी दिली.

