आणखीपुणेमहाराष्ट्र

पुणे जिल्ह्यात या आठवड्यातील निर्बंध पुढील आठवड्यातही कायम…

🛑उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत केल्या सूचना…

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला

✍️प्रतिनिधी : सुर्यकांत जाधव

🎴पुणे: दि १६ : कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्य सोयीसुविधा वाढविण्यात येत असून सरकार नागरिकांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेत आहे. नागरिकांनीही निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून सार्वजनिक स्थळी तसेच पर्यटनस्थळी गर्दी न करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे विधानभवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.अजित पवार म्हणाले की, करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य सोयीसुविधा वाढविण्यात येत असून सरकार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करावे. जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्ण वाढीचा दर स्थिर असला तरी या आठवड्यातील निर्बंध पुढील आठवड्यातही कायम राहतील.

ज्या नागरिकांनी लसचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय राज्य सरकार घेत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘नियमांचे पालन करून काही उद्योगधंदे सुरू आहेत. उद्योगपतींनीही त्यांच्या कामगारांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढत असून आवश्यक तेवढा लस पुरवठा होत नाही. तरीही जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्यात येत आहेत.’ जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाहता गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर जास्तीत जास्त भर देण्यात यावा, अशी सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!