🛑 अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴अलिबाग,दि. १५:- रायगड जिल्ह्यातील अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. आजच म्हणजे १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. मागील ३ ते ४ वर्षांपासून ते आजारी होते.
त्यावेळच्या झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि २००४ ते २००९ या काळात अलिबाग-उरण मतदार संघाचे ते आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश कॉंग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सावंतवाडी येथील जिल्हा बँक चे निवृत्त कर्मचारी रामानंद शिरोडकर यांची मुलगी श्रध्दा शिरोडकर यांचे ते सासरे होत. आज दुपारी २ वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

