जि.प.च्या स्थायी समितीवर मायकल डिसोजा यांची बिनविरोध निवड
*सावंतवाडी ता.१४-:* जिल्हा परिषद स्थायी समितीवर जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ही निवड करण्यात आली आहे.
गेली अनेक वर्ष मायकल डिसोजा हे समाजकारण करत असून, त्यानी आपल्या जिल्हा परिषद मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून विकास केला आहे. या कामाची दखल घेऊन खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, गटनेते नागेंद्र परब, सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी त्यांची या पदासाठी शिफारस केली होती. या निवडीमुळे तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकानी समाधान व्यक्त केले आहे.

