आणखीकोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

गावातील स्थानिक ग्रामस्थ त्या ठिकाणी चौकीदार म्हणुन नियुक्त, सुचना फलक लावण्यात देखिल आलेत…

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी : दि. ०३ माडखोल धरण पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने, धरणावर जाण्याचा मोह कोणाला आवरत नाही. या मोहापायी दोन युवकांना आपले प्राण गमवावे लागणार होते, मात्र स्थानिक युवकांनी प्रसंगवधान राखून तात्काळ पाण्याचा प्रवाह पुढे जाऊन दोरीच्या सहाय्याने त्या युवकांना वाचल्यावर येथील रहिवासी व बँजो विकास मंडळ सिंधुदुर्गचे अध्यक्ष लखन आडेलकर यांनी पाटबंधारे विभागाला धरणाच्या ठिकाणी चौकीदार नेमून सूचना फलक लावण्याचे निवेदन दिले होते. त्याची तात्काळ दखल घेऊन स्थानिक ग्रामस्थाला चौकीदार म्हणून नेमून व सूचना फलक लावण्यात आले आहेत.

या पत्राच्या अनुषंगाने गावातील स्थानिक ग्रामस्थ त्या ठिकाणी चौकीदार म्हणून नियुक्त केले व सूचना फलक लावण्यात आले आहेत. बुधवार, शनिवार व रविवार या दिवशी पोलीस प्रशासन होमगार्ड नेमून सहकार्य करण्याचे लेखी पत्र व मागणी पाटबंधारे विभागाने स्थानिक पोलिसांकडे केली आहे. पाटबंधारे विभागाच्या कार्यवाहीचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून धन्यवाद दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!