कोंडुरे गावात नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाईन शिक्षणावर परिणाम, मुलांची होत आहे गैरसोय…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : राहुल गायकवाड
🎴सावंतवाडी : दि. ०३ कोंडूरे गावात नेटवर्क मिळत नसल्याने, त्याचा परिणाम मुलांच्या ऑनलाईन शिक्षणावर होत असून, त्यांची गैरसोय होत आहे. अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.
गावात इतर सर्व सुविधा असून, केवळ नेटवर्क नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी पावसाळयात मुलांना दोन – तीन किलोमीटर चालत जावे लागत आहे.
त्यामुळे प्रशासनाने यावर ठोस निर्णय घेवून जाहीर करावा. अन्यथा पुढच्यावेळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा मुलांच्या पालकांनी दिला आहे.

