सामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बांदा-सावंतवाडी मार्ग बंद पडत असल्याचेकडे माजी उपसरपंच कृष्णा सावंत यांनी वेधले सा.बा. विभागाचे लक्ष..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴सावंतवाडी,दि.१०: इन्सुली पागावाडी येथील पुल सुमारे पन्नास वर्षांपूर्वी कमी उंचीचे बांधलेले आहे, ते सध्या धोकादायक बनले आहे. या धोकादायक पुलावरून शेतकऱ्यांचे पावसाळ्यात मोठे नुकसान होत असून पावसाळ्यामध्ये ब्रिजवर वारंवार पाणी येत असल्याने गुरे वाहून जात असून बांदा-सावंतवाडी मार्गही बंद पडत असल्याचेकडे माजी उपसरपंच कृष्णा सावंत यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

इन्सुली गावचे माजी उपसरपंच कृष्णा सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले, तसेच ते पालकमंत्र्यांना निवेदन देणार आहेत, असे बोलताना म्हणाले.

बांधकाम खात्याला निवेदन दिले, त्यावेळी सचिन सावंत, दत्‍ताराम सावंत, प्रभाकर पेडणेकर, प्रदीप सावंत, हेमंत राणे, राजाराम कोठावळे, अविनाश सावंत, आप्पा कोठावळे, नंदू नाईक, सखाराम पेडणेकर आदी उपस्थित होते

बांधकाम उपअभियंता अनिल आवटी व कनिष्ठ अभियंता शितल सर्फे उपस्थित होत्या या निवेदनात कृष्णा सावंत यांनी म्हटले आहे की, या  ब्रिजवर खड्डे पडून ते ठिसूळ झालेले आहे आतापर्यंत सुमारे १७ ते १८ लोकांना या ब्रीजमुळे दुखापती झाले आहेत तसेच पावसाळ्यामध्ये गुरेही वाहून जाऊन गंभीर इजा झाल्या आहेत या पुलावरून शाळकरी मुली वाहून गेल्या होत्या तसेच शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांना देखील वाहून गेल्यामुळे सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले आहे.

दरवर्षी हा पूल धोकादायक बनत असून पावसाळ्यामध्ये बांदा सावंतवाडी मार्गावरील पर्यायी वाहतूक देणाऱ्या रस्त्यावरील पूल कायमच पुराच्या पाण्यामुळे बंद असते त्यामुळे बांधकाम खात्याने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. इन्सुली पागावाडी येथील पुल नवीन बांधून त्याची उंची वाढवावी आणि लोक व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील कृष्णा सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे

सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष दिले नाही तर मार्च २०२१ मध्ये आमरण उपोषणास शिवसैनिकांना घेऊन बसणार असल्याचा इशारा देखील कृष्णा सावंत यांनी दिला आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!