नियमानुसार कणकवली शहरातील दुकानेदेखील सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार – समीर नलावडे
🛑 सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियावर फिरत असलेली लॉकडाऊन संदर्भातील ती पोस्ट फेक…
🛑 नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवुन लॉकडाऊनच्या भीतीने खरेदीसाठी गर्दी करू नये
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव
🎴कणकवली : दि. ३० सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सोशल मीडियावर फिरत असलेली लॉकडाऊन संदर्भातील ती पोस्ट फेक असुन, सध्याच्या स्थितीत सुरू असलेल्या निर्बंधाप्रमाणे सायंकाळी ४ वाजेपर्यंत कणकवलीतील दुकाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवुन लॉकडाऊनच्या भीतीने खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या नावाने गतवर्षीच्या कोविड काळातील २ ते ८ जुलैपर्यंत लॉकडाऊन होणार अशी जुनी पोस्ट आत्ता सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. मात्र ही पोस्ट गतवर्षीची असुन सध्याच्या स्थितीत सायंकाळी ४ वाजेपर्यंत नियमानुसार मुभा दिलेली दुकाने सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.
तसेच सायंकाळी ५ नंतर संचारबंदीचे आदेश आहेत. त्यामुळे या आदेशाप्रमाणेच शासन नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवुन दुकाने बंद होतील, या भीतीने खरेदीसाठी गर्दी करू नये.
नियमानुसार कणकवली शहरातील दुकाने देखील सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.