कोकणसामाजिकसिंधुदुर्ग

राजश्री शाहू महाराज प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग

*🛑 लोककल्याणकारी राजा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा कार्यक्रमात पंधराशे बेचाळीस विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग*

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी :*प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी, दि- :-*
लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत राज्यातील नऊ विभागातुन अकरावी व बारावीच्या १५४२ विद्यार्थ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवून एक वेगळाच विक्रम केला.
राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेच्यावतीने मराठी व इंग्रजी या दोन भाषेत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील नाशिक विभागातुन ३३१ , अमरावती विभागात ३०२, मुंबई विभागातुन २५३, पुणे विभाग १९७, कोल्हापूर विभाग १७४, लातुर विभाग १६२, औरंगाबाद विभाग ५४, नागपूर विभागात ५० तर अती दुर्गम अश्या कोकण विभागातुन १९ विद्यार्थी सहभागी झाले होते. राज्यशास्त्र परिषद राज्यात विद्यार्थी व शिक्षक यांच्या हिताचे विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. भविष्यातही अनेक विद्यार्थी व शिक्षक यांच्या हिताचे कार्यक्रम करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुमित पवार यांनी सांगितले. स्पर्धा यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. संजय सुतार, तंत्र विभागाचे व राज्य संशोधन प्रमुख आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रमुख प्रा. अविनाश यमगर, स्पर्धा समन्वयक प्रा. शाम दुसाने, स्पर्धा प्रसिद्धी प्रमुख प्रा. राम बागुल व स्पर्धा तंत्रस्नेही प्रमुख प्रा. गिरीष लोंढे, राज्य उपाध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे, प्रा. शरद जोगी, कार्याध्यक्ष संजय सुतार, सचिव डॉ. पितांबर उरकुडे, कोषाध्यक्ष स्मिताताई जयकर सहसचिव सुनिल राठोड, व राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व विभागीय अध्यक्ष व सचिव तसेच कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य त्याच बरोबर छत्तीस जिल्ह्यातील अध्यक्ष, सचिव कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा यशस्वीतेसाठी परीश्रम घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन अध्यक्ष प्रा.सुमित पवार यांनी केले.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🎊लग्नसमारंभ,वाढदिवस पार्टी साठी लागणारे डिश,पत्रावळी,द्रोण माफक दरात घेऊन चला….🍽️🎉*

*😍सुहासिनी गृह उद्योग सावंतवाडी😍*

_🍽️आमच्याकडे लग्नकार्यासाठी व बर्थडे पार्टी साठी लागणाऱ्या उत्तम प्रतिच्या पत्रावळी, द्रोण ,डिश ,ग्लास,पूजेसाठी लहान द्रोण माफक दरात मिळतील.🍽️_

*🏛️संपर्क व पत्ता:-*
*संतोष वासुदेव संगम*
१८० न्यू सबनिसवाडा गोठण सावंतवाडी
*🎴मोबाईल-९४२३३०४६५९*
*प्रोप्रा. सुरभी संतोष सगम*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FiUpx9Y03kdHjAHlJAYwkX

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!