आणखीकोकणशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावरवाडकर यांच्या घराजवळील विद्युत पोल धोकादायक

🛑 वारंवार कळवूनही विद्युत वितरण अधिकारी करत आहेत कानाडोळा

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️कार्यकारी संपादक – आनंद धोंड

🎴सावंतवाडी : दि. २९ तालुक्यातील शिरशिंगे धोंडवाडी येथील रहिवासी राजेंद्र सावरवाडकर यांच्या घरा शेजारील विद्युत पोल पूर्णपणे जीर्ण झाला असून कोणत्याही क्षणी तो घरावर कोसळू शकतो. असे असताना मात्र विद्युत कर्मचारी अधिकारी यांना वारंवार कळवूनही याकडे ते कानाडोळा करत आहेत.

महावितरण विद्युत मंडळ माडखोल विभाग यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन नवीन लाईट पोल बदलून द्यावा व जीवित हानीचा धोका टाळावा, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे. अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा राजेंद्र सावरवाडकर यांनी विद्युत वितरण कंपनीला दिला आहे.

One thought on “सावरवाडकर यांच्या घराजवळील विद्युत पोल धोकादायक

  • अनंत नाईक

    अशाप्रकारे कितीतरी पोल खराब झालेले आमच्या गावात व आजूबाजूला आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!