आपत्कालीनकोकणसिंधुदुर्ग

झाराप-पत्रादेवी महामार्गावर अपघात; कारच्या समोरील भागाचे नुकसान…

झाराप-पत्रदेवी महामार्गावर अपघात; कारच्या समोरील भागाचे नुकसान…

सावंतवाडी दि. २९: इनोव्हा कारची धडक बसून झालेल्या अपघातात बैल जागीच ठार झाला. हा अपघात आज सकाळच्या सुमारास झाराप-पत्रादेवी महामार्गावर मळगाव येथे घडला. दरम्यान या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कारमधील कोणीही जखमी झाले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित बैल हा मळगाव सुतारवाडी येथील देवानंद मेस्त्री यांच्या मालकीचा होता. त्याला चरण्यासाठी सोडले असता तो महामार्गावर आला. दरम्यान बांदा येथून वेंगुर्लेच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा कारची त्याला जोरदार धडक बसली. यात तो जागीच गतप्राण झाला. तर कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान ऐन शेतीच्या हंगामात बै गमावल्याने शेतकरी मेस्त्री हवालदिल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!