शिरशिंगे येथे १८ ते ४५ वयोगटातील लोकांसाठी मोफत लसीकरण
🛑शिरशिंगे ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️कार्यकारी संपादक – आनंद धोंड
🎴सावंतवाडी : दि. २९ तालुक्यातील शिरशिंगे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १८ ते ४५ वयोगटातील लोकांसाठी सोमवार दिनांक २८ जून रोजी शिरशिंगे ग्रामपंचायत मध्ये मोफत कोविशिल्ड लसीकरणाचा डोस देण्यात आला. या लसीकरणाचा महिला व पुरुष मिळून जवळपास ८३ लोकांनी लाभ घेतला असून याकरिता पंचायत समिती माजी सभापती तथा विद्यमान सदस्य रवींद्र माडगावकर, शिरशिंगे उपसरपंच पांडुरंग राऊळ, पोलीस पाटील गणू राऊळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी तलाठी घाडीगावकर, ग्रामसेवक काकडे, आरोग्य सेवक / सेविका, आरोग्य कर्मचारी, कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते.

