सामाजिकसिंधुदुर्ग

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आमच्यावर अन्याय करतेय.. आम्हाला न्याय कोण देणार..?

अनुकंपा भरतीसाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवार अमोल जंगले व स्नेहल पाटील यांचा जिल्हा परिषदला सवाल..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदूर्गनगरी,दि.१०: शासनाच्या अनुकंपा भरतीबाबतच्या मार्गदर्शक सुचनांनुसार अमोल जंगले यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी जि प सिंधुदुर्ग कडे परिपूर्ण प्रस्ताव सादर केले.परंतु अमोल जंगले यांच्या वडीलांना दि.३१ डिसेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य असल्याचे कारण दाखवून त्यांना दि.१३/०९/२०१९ रोजी पार पडलेल्या अनुकंपा भरतीप्रक्रियेतून ठरवून मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सिंधुदुर्ग यांनी अपात्र ठरवून वगळणेत आले. मात्र एकीकडे जि.प. सिंधुदुर्ग  श्रीम.विशाखा प्रकाश शिंगाडे यांच्या वडीलांना देखील दि.३१ डिसेंबर २००१ नंतर २ एकूण ४ अपत्ये असूनही त्यांना सन जानेवारी २०१७ मध्ये कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदावर  वित्त विभाग जि.प.सिंधुदुर्ग येथे नियम बाह्य अनुकंपा तत्वावर नोकरी देते तर दुसरीकडे आम्हाला अपात्र ठरवून अन्याय करत असा आरोप अमोल जंगले यांनी प्रसिद्ध पत्रकातून केला आहे.

सदरच्या नियुक्तीबाबत आम्ही लेखी तक्रार दाखल करुन देखील जिल्हा परिषद प्रशासन त्याची दखल घेत नाही.आमच्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द आवाज उठविणेसाठी आम्ही दि.२६ जानेवारी २०२० रोजी आमरण उपोषण केेले होते. यावेळी मुख्य.कार्यकारी अधिकारी जि.प.सिंधुदुर्ग व मा. उप मख्य कार्यकारी (सा.प्र) जि.प.सिंधुदुर्ग यांनी सदर शिंगाडे नियुक्तीची पुढील ०८ दिवसात चौकशी करुन कार्यवाही केली जाईल असे लेखी पत्र  (साप्रवि, जि.प.सिंधुदुर्ग कडून क्र.सिंजिप/साप्रवि/आस्था-०१/उपोषण/४९३४/२०२० दि. २६/०१/२०२० रोजी) पत्र दिले होते. परंतू अदयापपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही तपासाची कार्यवाही झालेली नाही. याबाबत आम्ही वेळोवेळी विचारले असता तपास चालू आहे असे वारंवार सांगितले जात होते. तसेच दि.१५ ऑगस्ट २०२० रोजी देखील आम्ही उपोषणाला बसल्यावर जि प प्रशासनाकडून अगदी तशाच प्रकारे वेळ मारून नेली. आमच्या नियुक्तीचे प्रकरण हे मा.सचिव ग्राम विकास विभाग यांजकडे मार्गदर्शनासाठी पाठविलेले आहे असे सांगुन प्रशासनाकडून आजपर्यंत आमची दिशाभूल केलेली आहे.दि.११/०९/२०२० रोजी आम्ही वकीलांमार्फत मा.मु.का.अ. यांना नोटीस दिलेली आहे. यामध्ये आमच्या प्रकरणाचा शासनाकडून जोपर्यंत निकाल येत नाही आणि विखासा शिंगाडे यांच्या नियुकतीसाठी कोणते नियम वापरले गेले किंवा कोणते नियम शिथील केले आहेत याचा खुलासा होईपर्यंत पुढील अनुकंपा भरती करु नये असे नमूद केलेले आहे.मात्र जि प प्रशासन (साप्रवि, जि.प.सिंधुदुर्ग कडून क्र.सिंजिप/साप्रवि/आस्था-01/1707/20 दि.05.10.2020 रोजी)च्या पत्रकान्वये अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द करणेत आली. तसेच दि.परिपत्रक क्र.सिंजिप/साप्रवि/आस्था-01/1722/20 दि.06.10.2020 अन्वये दि.09.10.2020 रोजी अनुकंपा भरतीकरिता सदर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणेबाबत कळविलेले आहे. परंतू सदरच्या यादीमधून आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देता आमचे नाव वगळणेत आलेले असून आमचेवर अन्याय केलेला आहे.जिल्हा परिषदेमध्ये मा.मुकाअ व साप्रवि प्रशासनाचा मनमानी कारभार चाललेला असून आमचेवर जाणून बुजून अन्याय करीत आलेले आहेत. नेहमी आमचा आवाज दाबणयाचा प्रयत्न केला गेला आहे. असा आरोप अमोल बाळकृष्ण जंगले, स्नेहल रविकांत पाटील यांनी केला आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!