आरोग्यकोकणराजकीयसिंधुदुर्ग

जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील सुरक्षा यंत्रणा सांभाळणाऱ्या पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे मनसेने वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष..

_*🛑 जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील सुरक्षा यंत्रणा सांभाळणाऱ्या पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे मनसेने वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर*

*🎴कुडाळ, दि-२५ :-* जिल्हा रुग्णालय ओरस येथे पोलिस बांधव किंवा सुरक्षा एजंसी चे कर्मचारी गेली दोन ते दिड वर्ष जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर एक तंबू बांधून आपली सेवा बजावत आहेत.
कोरोनाच्या कालावधी मध्ये प्रशासनाने लाखो कोटी रुपये खर्च केलेत. परंतु आपल्याला जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर तंबूत राहून सेवा बजावणाऱ्या या पोलिस बांधवांचा प्रशासनाने मात्र कोणताही विचार केला नाही.
जनते साठी आपल्या जिवाची पर्वा न करता सतत झटणाऱ्या या पोलिस बांधवांसाठी एक पत्र्याची शेड तरी प्रशासनाने या ठिकाणी उभी करून द्यावी. त्यामुळे तपाऊसा पासून संरक्षण करण्यासाठी त्यांना मदत होईल. त्यामुळे लवकरात लवकर या पोलिस बांधवांसाठी पत्र्याची शेड प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली. यावेळी महाराष्ट्र सैनिक आशिष सुभेदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!