येत्या १५ दिवसात बिरोडकर टेंबवर सुरु होईल ओपन जीम
सावंतवाडी न्यू सबनिसवाडा बिरोडकर टेंब सुवर्ण कॉलनी येथील गार्डन मध्ये ओपन जिम चा भूमिपूजन सोहळा आज जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत ,माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष संजू परब ,संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते ,नगरसेवक बाबू कुडतरकर ,अनारोजीन लोबो, सुरेंद्र बांदेकर ,नासीर शेख, आनंद नेवगी, प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे, शब्बीर मणियार,यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
येथील गार्डन मध्ये सुसज्ज अशी ओपन जिम उभारण्यात येणार आहे, त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या पंधरा दिवसात हे काम पूर्ण होईल असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला, तसेच गार्डन च्या विकासासाठी जेवढी मदत लागेल तेवढी केली जाईल असे आश्वासन बिरोडकर टेंब कला क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे संपादक सीताराम गावडे यांच्याशी बोलताना पालकमंत्री सामंत यांनी दिले.
न्यू सबनिसवाडा प्रभागाचे नगरसेवक व शिवसेनेचे शहर प्रमुख खेमराज कुडतरकर यांच्या प्रयत्नाने व नगराध्यक्ष संजू परब यांच्या सहकार्याने तसेच याकामी पालकमंत्री उदय सामंत माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने हे स्वप्न सत्यात उतरत आहे असे नगरसेवक कुडतरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी शहरातील विविध प्रभागातील विकासकामांची भूमिपूजन करण्यात आलीत.

