ग्रामस्थांचा विरोध असतानादेखील देवसू दाणोली ग्रामपंचायत कडून केल्या गेलेला रस्ता पहिल्याच पावसात चिखलमय… नागरी भागातील रस्त्यापेक्षा ग्रामपंचायतला स्मशानभूमीच्या रस्ते अधिक महत्त्वाचे…..दाणोली गावठण ग्रामस्थांचा आरोप
*▪️ग्रामस्थांचा विरोध असतानादेखील देवसू दाणोली ग्रामपंचायत कडून केल्या गेलेला रस्ता पहिल्याच पावसात चिखलमय…*
*▪️नागरी भागातील रस्त्यापेक्षा ग्रामपंचायतला स्मशानभूमीच्या रस्ते अधिक महत्त्वाचे…..दाणोली गावठण ग्रामस्थांचा आरोप*
*🖥️ Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*
*🎴देवसू,दि,२४जून:-**देवसू दाणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये दानोली गावठाण स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करताना डोंगरावरुन वाहत येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणती उपाययोजना न केल्यामुळे हा रस्सा पहिल्याच पावसात चिखलमय झाला तसेच हा रस्ता करताना संबंधित जमीन मालकांचा विरोध असतानादेखील ग्रामपंचायतीने जबरदस्तीने हा रस्ता केल्याचा आरोप दाणोली गावठाण येथील ग्रामस्थांनी केला आहे. दानोली गावठाण येथील चरवाडी येथील दहा घरे रस्त्यापासून वंचित असून या वाडीला रस्त्याची अत्यंत आवश्यकता असताना त्यासाठी कुठलीही उपाययोजना न करता ग्रामपंचायत मे स्मशानभूमीचे रस्ते केल्याने ग्रामपंचायतला जिवंत माणसांपेक्षा मेलेल्यांची जास्त काळजी असल्याची खंत ग्रामस्थांनी बोलून दाखवली. सात-आठ महिन्यांपूर्वी या वाडीतील एका आजारी व्यक्तीला रस्ता नसल्याने अक्षरशः चादरीतून उचलून रुग्णालयात न्यावे लागले होते. एवढे ढळढळीत उदाहरण समोर असताना देखील त्यानंतर ग्रामपंचायत ने स्मशानभूमी चा रस्त्याला प्राथमिकता दर्शवल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. हा रस्ता करताना संबंधित जमीन मालकाची परवानगी नसल्याचे पत्र ग्रामपंचायत सदस्य दिशा सावंत यांनी ग्रामपंचायतला दिले होते व आपला विरोध दर्शवला होता मात्र याची कुठलीही दखल न घेता ग्रामपंचायतीने हे काम पूर्ण केले. या संपूर्ण कामाची चौकशी वरिष्ठ पातळीवर दाद मागणार असल्याची माहिती सौ दिशा सावंत यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग ला दिली.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
*🚲फक्त एक फोन करा आणि सायकल मिळवा घरपोच🏛️*
_🔐लाँकडाऊनला सहकार्य करुया.._
_सायकल चालवून आरोग्यदायी फायदे मिळवूया🚲_
_🚲नवीन सायकल खरेदी साठी विश्वसनीय ठिकाण *सन १९५३* पासून_
*पेडणेकर सायकल कंपनी*
_मेनरोड,सालईवाडा ता.सावंतवाडी_
🔷जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे टिकाऊ व दमदार सायकल ची विविध प्रकार उपलब्ध
*🚴🏻♀️😍चला तर मग वाट कुणाची बघताय आपली नवीन सायकल खरेदी करुया😍🚴🏻♀️*
💷बजाज फायनान्स ची सेवा उपलब्ध
☎️फोन करा आणि मिळवा घरपोच सायकल
*📲संपर्क:- 9421269525/7083235822/8108285128*
अटी व नियम लागू
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

