कोकणरत्नागिरी

राजापुरात हिंदू साम्राज्य दिन साजरा

राजापूर येथे आज शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती स्मारकाची विधीवत पाद्यपूजा करून शिवस्मारकाला बजरंग दल संयोजक अद्वैत अभ्यंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती जयघोष अशा प्रकारचा कार्यक्रम करण्यात आला. यानंतर गुगल मीटवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते प्रसिध्द व्याख्याते दिलीप गोखले यांचे छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक हिंदूसाम्राज्यदिन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद लाभला.
सदर कार्यक्रम विश्व हिंदू परिषद बजरंग दल राजापूर प्रखंड यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बजरंग दल तालुका संयोजक श्री. अद्वैत अभ्यंकर, विश्व हिंदू परिषद तालुका संयोजक श्री. अशोक पाटणकर, विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री श्री. संदेश टिळेकर,
राजू करंबेळकर, सुरेश पवार, गुरुप्रसाद ठाकुरदेसाई, वसंत सोहनी शेढे, कृष्णा करंबेळकर आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!