शासकीय खरेदी अंतर्गत करण्यात आलेल्या भात खरेदीवर देण्यात येणा-या बोनस पासून जिल्ह्यातील ६८९० शेतकरी वंचित
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी : दि.२३ शासकीय खरेदी अंतर्गत करण्यात आलेल्या भात खरेदीवर देण्यात येणा-या बोनस पासून जिल्ह्यातील ६८९० शेतकरी वंचित आहेत. त्यांना अद्याप पर्यंत मिळणारी ५ कोटी ७५ लाख बोनसची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे ती तत्काळ देण्याची व्यवस्था करण्यात यावी, याकडे सावंतवाडी माजी पंचायत समिती उपसभापती तथा भाजपचे युवा नेते महेश सारंग यांनी विधानसभा मुख्य प्रतोद तथा भाजपा नेते आशिष शेलार यांचे लक्ष वेधले आहे.
याबाबत त्यांनी आज शेलार यांना निवेदन दिले.
यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६८९० शेतकरी बोनस पासून वंचित आहेत,असे त्यांनी म्हटले आहे.त्यांना प्रत्येक क्विंटल मागे सातशे रुपये बोनस मिळणे गरजेचे होते परंतु अद्यापपर्यंत ती रक्कम मिळालेला नाही, त्यामुळे ही थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी, याकडे श्री.सारंग यांनी लक्ष वेधले असून शासन स्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी महेश सारंग यांनी केली आहे.
यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, अतुल काळसेकर,शरद चव्हाण,राजू राऊळ, प्रसन्न देसाई, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

