वेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

‘पंचक्रोशी हेल्प ग्रुप’ कडून निराधार महिलेला मदतीचा हात..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले,दि.१०: संजीवनी सचिन हळदणकर (वय ५२) राहणार कोचरा-भावईवाडी या महिलेचे राहते मातीचे घर दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी अतिवृष्टीमुळे पूर्ण जमीनदोस्त झाले आहे, तिच्या कुटुंबात कमावता कोणी नसून काहिवर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन होऊन ती आणि तिचा १८ वर्षाचा मुलगा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. राहतं घर पडल्यामुळे या कुटुंबाच्या डोक्यावरील छत हरवले असून हे कुटुंब उघड्यावर पडले आहे. सध्या या कुटुंबाला कोचरा भावई मंदिर नजीक राहणाऱ्या श्री. दाजी परब यांनी तात्पुरता राहण्यासाठी आश्रय दिला आहे. हे घर पुन्हा बांधायचे असून घरकुल योजनेअंतर्गत हे घर अजूनही मंजूर झाले नसून सदर महिलेला तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे. ही घटना ‘पंचक्रोशी हेल्प ग्रुप’ (म्हापण-पाट-परूळे-कोचरा) च्या सदस्यांना समजताच त्यांनी सदर महिला सध्या राहत असलेल्या ठिकाणी जाऊन तीला रोख रक्कम पाच हजार रूपयांची आर्थिक मदत केली.

नवीन घर बांधणीसाठी मोठ्या आर्थिक रकमेची गरज असल्याने  समाजातील  दानशूर व्यक्तींनी सदर निराधार कुटुंबाला आर्थिक मदत करून त्यांच्या डोक्यावरील हरवलेलं छत परत मिळवून देण्यासाठी  जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी असे आवाहन पंचक्रोशी हेल्प ग्रुप च्या सदस्यांनी यावेळी केले.

यावेळी सर्व श्री. मिलिंद पाटकर, अजय नार्वेकर, बंटी कांबळी, प्रवीण राणे, नाना केळुसकर, समीर चव्हाण आदी पंचक्रोशी हेल्प ग्रुप सदस्य उपस्थित होते.

*🔥आमच्या सुसज्ज ‘स्नेहल निवास’ मधील जागा भाड्याने देणे आहे*🔥

_💫मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आर.सी.सी. बिल्डिंगमध्ये…_

_💫नांदगाव तिठ्याजवळ 1200 स्केअर फूट व समोर 1000 स्केअर फूट पार्किंग व्यवस्था उपलब्ध.._

_💫हॉटेल, वित्त संस्था, दुकान, ऑफिस, व इतर उपयोगांसाठी भाडे तत्वावर जागा देणे आहे.._

_💫तसेच वन रुम, टू रुम, थ्री रुम किचन ब्लॉक भाड्याने देणे आहेत.._

_💫पाणी 24 तास उपलब्ध.._

*_💥आजच संपर्क साधा! आणि व्हा निश्चिंत!!! 💥_*

*🤷🏻‍♂️ आमचा पत्ता 🤷🏻‍♀️*
*_🏬 स्नेहल निवास_*
*_नांदगाव तिठा जवळ, नांदगाव_*
*_तालुका. कणकवली, जिल्हा. सिंधुदुर्ग_*
*_📱मोबाईल : 9987278080_*
*_9969198433_*
*_9730425324_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!