कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैभववाडी येथे कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी : दि. २२ काॕग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वैभववाडी येथे कार्यकर्त्यांनी काॕग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी जिल्हा युवक काॕग्रेस अध्यक्ष देवानंद लुडबे, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, चिटणीस बाळू अंधारी, वैभववाडी तालुका युवक काॕग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, काॕग्रेस नेते आनंद पवार, जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, मधुकर पाटेकर आदी उपस्थित होते.
काॕग्रेस मध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये करुळ येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा पांचाळ, आचिर्णे येथील दीलीप मनोहर रावराणे, कोकिसरे येथील शशिकांत वळंजू, सुधाकर लाड, दत्ताराम चव्हाण, रमेश गुरव, खांबाळे येथील सिध्दार्थ कांबळे, मंगेश पवार, सुनिल जाधव यांनी वैभववाडी युवक काॕग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, आनंद पवार यांच्या नेतृत्वाखाली काॕग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
वैभववाडी तालुक्यात काॕग्रेस पक्षात अनेक कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे काॕग्रेस पदाधिका-यांनी यावेळी सांगितले.

