गणेश उत्सवापूर्वी माजगाव सावंतवाडी मधून वीज जोडणी द्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याच दिला इशारा.
🛑शेवटी संयमाचा बांध फुटला, ओटवणे ग्रामस्थांच्या शिष्ट मंडळाची वीज वितरणला धडक…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : अक्षय (बबलु) गांवकर
🎴ओटवणे : दि. २२ ग्रामस्थांनी वीज वितरण सावंतवाडी कार्यालयात धडक देत अनियमित विजे संदर्भात उपअभियंता घोरे व सहाययक अभियंता बोथरे याना धारेवर धरत सावंतवाडी मांडून वीज जोडणी द्या अन्यथा गणेश उत्सवापूर्वी आंदोलन छेडण्याच इशारा दिला.
अधिकाऱ्यांनी आपली वेळ मारून नेते थातुर मातु र उत्तरे दिली यावेळी तुम्ही करणे सांगू नका वीज समस्या सोडवणार कि जमत नाही ते सांगा असे खडे बोल रवींद्र म्हापसेकर यांनी सुनावले तर तुमच्या अडचण दहा वर्ष ऐकतोय आता आम्हाला लेखी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा अशी मागणी संतोष भै रवकर ,सगुण गावकर,संतोष तावडे,संतोष तरी प्रमोद केळुसकर भाई गावकर स्वप्नील म्हापसेकर यांनी केली.
अनंत तावडे यांनी कायमची वीज बंद करा मग तुम्हाला समाधान मिळेल अशी अधिकारांची खिल्ली उडवली तर वीज समस्येला सामोरे जाण्याचा संयम सुटला असून आता यापुढें समस्या जाणवल्यास समजूतदार पण सोडावा लागेल अशी समज तावडे यांनी दिली.
दीपक गावकर ,स्वप्नील उपरकर यांनी 2 दिवसात सर्वे करून 24 तास वीज पुरवठा सुरळीत ठेवा आणि तातडीने सावंतवाडी मधून वीज जोडणी करा असे सांगितले.
हि सर्व चर्चा 2 तास चालली होती शेवटी उपअभियंता घोरे यांनी चालू असलेला वीज पुरवठा सुरळीत चालू राहील याकडे स्वतः लक्ष घालेन 2 दिवसात सर्वे करू व सावंतवाडी तुन वीज जोडणी देण्यास तातडीने प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
ग्रामस्थांनी निवेदन अधिकारी घोरे याना दिले व वरिष्ठ अभियंता कुडाळ याना सावंतवडी त बोलून यावर ग्रामस्थांना चर्चेस बोलवावे अशी मागणी केली यावर घोरे यांनी अनुमती दर्शवली.

