दुर्मिळ रक्तदात्यांनी जपली सामाजिक बांधिलकी ; युवा रक्तदाता संघटनेचे विशेष प्रयत्न
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी : दि. २२ उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या आप्पासाहेब करनुरे (वय ७८) या रुग्णाला तातडीने B- निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता होती. यावेळी कोलगाव येथील सिद्धेश नाईक, भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय सावंतवाडीचे विद्यार्थी वैभव मस्के यांनी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदान केले.
कोव्हीड काळात अतिदुर्मिळ असलेल्या या रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. तर गोवा-बांबुळी इथं एका रूग्णाला दुर्मिळ ओ निगेटिव्ह रक्ताची आवश्यकता होती. या रुग्णाला देखील युवा रक्तदाता संघटनेचा माध्यमातून रक्ताची उपलब्धता करून देण्यात आली.

